शिव पुराणात अध्याय २६ मध्ये त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग आणि गंगा नदीचे धरतीवरील आगमन याबद्दल विस्तृत वर्णन केले गेले आहे. त्याचप्रमाणे यात त्र्यंबकेश्वर मध्ये पूजा-अर्चना केल्याने होणारी फलप्राप्ती वर्णित आहे. त्र्यंबकेश्वर मध्ये केलेले अनुष्ठान-पूजा हे सफल होतात याचे भक्तांना नेहमीच अनुभव येतात. ह्या पुण्य स्थळी पूजा-अनुष्ठान केल्याने पापमुक्ती तर होतेच शिवाय पुण्यप्राप्ती देखील होते.
‘‘य: पश्येद्भक्तितो ज्योतिर्लिंगं त्र्यंबकनामकम् ।
पूजयेत्प्रणमेत्सतुत्वा सर्वपापै: प्रमुच्यते’’
- शिवपुराण, संहिता ४ (कोटिरुद्रसंहिता), अध्याय २६
श्लोकाचा अर्थ - जो भाविक अत्यंत भक्तिभावाने त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतो आणि उत्तम रीतीने स्तुति करतो तो तात्काळ सर्व पापातून मुक्त होतो.
त्र्यंबकेश्वर इथे शास्त्रोक्त पद्धतीने वेगवेगळ्या पूजा, विधी केल्या जातात. “नारायण नागबळी पूजा” ही वैदिक पूजा आहे जी पितृदोषाच्या निवारणासाठी केली जाते, ह्या पूजेसाठी ३ दिवसांचा कालावधी आवश्यक आहे. यामध्ये २ वेगवेगळ्या प्रकारच्या विधी केले जातात जसे नारायण बळी आणि नागबळी. पित्रांच्या असंतुष्ट आत्मांच्या शांतीसाठी नारायण बळी पूजा केली जाते तसेच केल्याच्या पापातून मुक्त होण्यासाठी नागबळी पूजा केली जाते. दोन्ही पूजा पितृ दोष किंवा पितृ शापातून मुक्त होण्यासाठी तसेच पित्रांच्या आत्म्यांना शांती मिळण्यासाठी आणि नकळत सापाचा मृत्यू झाला असेल, तर त्या पापातून मुक्त होण्यासाठी केल्या जातात. तसेच ज्या व्यक्तीच्या देहावर अंतिमसंस्कार झाले नसतील (व्यक्ती घरातून निघून गेली असेल) अशा व्यक्तींच्या आत्म्यांना सदगति प्राप्त होण्यासाठी सुद्धा नारायण नागबळी विधी केला जातो.
जेव्हा एखाद्या व्यक्तीने नागाची हत्या केली असेल, वा करवली असेल, किंवा कुणी हत्या करत असताना अशा व्यक्तीला प्रोत्साहन दिले असेल, अथवा नागाची हत्या पाहत असताना त्यात अशा व्यक्तीला न अडविता त्यात आसुरी आनंद मानला असेल. तेव्हा अशा व्यक्तीस नागाच्या हत्येचे समान पाप लागते हा दोष त्याला लागतो. अशा प्रकारे पापाचे परिणाम हे अडचणीत होऊन दु:खप्राप्ती होते. त्याच्या निवारणार्थ हा विधी करावा लागतो.
आपल्या परिवारात अथवा मागील पिढींमध्ये एखाद्या व्यक्तीचा दुर्मरणात मृत्यू झाला असल्यास त्यांच्या आत्म्यांना सदगति प्राप्त करून देण्यासाठी हा विधी केला जातो.दुर्मरण एकूण ९० प्रकारचे असते; परंतु प्रामुख्याने खालील प्रकारचे मृत्यू दुर्मरणात मोडले जातात:
वरील सर्व कारणांमुळे परिवारातील व्यक्तींच्या पत्रिकेत पितृदोष तयार होतो. त्याच्या निवारणार्थ नारायण नागबळी विधी केला जातो. तसेच एखाद्या व्यक्तीच्या जन्मपत्रिकेत ग्रहांच्या स्थितीनुसार जर पितृदोष तयार झाला तर ज्योतिष त्याप्रमाणे पितृदोष निवारणार्थ नारायण नागबळी विधी करण्यास सांगतात. संतती प्राप्तीसाठी म्हणजेच कुळाच्या उन्नतीसाठी देखील नारायण नागबळी विधी केला जातो.
“नारायण बळी” म्हणजे आपली कुटुंबातील एखादी व्यक्ती अचानक अपघाती अथवा अनैसर्गिक तऱ्हेने मरण पावली असेल तर , अशा व्यक्तीला सद्गती मिळत नाही कारण अशा व्यक्तीच्या काही इच्छा अथवा अपेक्षा ह्या अपूर्ण राहिलेल्या असतात. अशा वेळी त्या व्यक्तीला मृत्यूनंतर सद्गतीप्राप्ती व्हावी यासाठी यासाठी नारायण बळी पूजा केली जाते.
जेव्हा व्यक्तीला त्याच्या निश्चित मृत्यूसमय येण्याच्या अगोदर म्हणजे अकाली मृत्यू येतो अथवा आत्महत्या केलेल्या माणसाचे शास्त्राप्रमाणे आत्मशांती प्रित्यर्थ दहनादी अथवा श्राद्धविधी न झाल्यास अशा व्यक्तीचे दुर्मरणामुळे जीवात्म्यास गती प्राप्त होत नाही. आणि तो सूक्ष्म अशा लिंगदेहाच्या रूपाने भटकत राहतो. तेव्हा अशा व्यक्तीच्या लिंगदेहाला गती प्राप्त व्हावी यासाठी आपल्याकडे शास्त्रोक्त पद्धतीने नारायण बळी करण्याचे विधान सांगितले आहे. नारायण बळी पूजेला “सद्गती नारायण बळी पूजा” म्हणून देखील ओळखले जाते. सद्गती म्हणजे आत्म्याचं स्वातंत्र्य. गरुड पुराणाच्या ४० व्या भागात सद्गती नारायण बळी पूजेचा अर्थ वर्णन केलेला आहे.
आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीकडुन कळत - नकळत नागाची हत्या झाली असेल अशा नागाला आत्मशांती लाभत नाही आणि तो वंशवृद्धीला प्रतिबंध निर्माण करून संतती होऊ देत नाही. तसेच इतर मार्गांनी घरातील व्यक्तींना त्रास देतो. म्हणून या त्रासातून मुक्तता हवी असेल तर मृत्युलोकीं भटकणाऱ्या नागाच्या आत्म्यास शांती लाभावी यासाठी “नागबळी पूजा” करणे अनिवार्य आहे. संपूर्ण भारतात नागबळी पूजा केवळ त्र्यंबकेश्वर मध्येच केली जाते.
त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात केल्या जाणाऱ्या सर्व धार्मिक विधींपैकी एक म्हणजेच नारायण नागबळी पूजा. त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात मंदिराच्या पूर्व दरवाज्याला स्थित अहिल्या गोदावरी संगम व सतीचे महास्मशान येथे नारायण नागबळी पूजा केली जाते. अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये नारायण नागबळी पूजा विधी विधानाचे महत्त्व सांगितले आहे.
नारायण नागबळी हा विधी तीन दिवसांचा विधी असतो
काम्य कर्माचे इच्छित फळ मिळण्यासाठी नारायण नागबळी पूजा विधी हा शुभ मुहूर्तावर करणे आवश्यक आहे. जेव्हा ग्रह बृहस्पति आणि ग्रह शुक्र "पौष" महिन्यात स्थापित होतात, तेव्हा तो चंद्र पंचांगानुसार अतिरिक्त महिना म्हणून ओळखला जातो. जेव्हा दिवसाची सुरुवात २२ व्या चंद्र स्थानापासून झाली असेल तेव्हा संतती प्राप्तीसाठी नारायण नागबळी पूजा त्या दिवशी करणे उचित मानले जाते. असे सुद्धा म्हटले जाते की चंद्र पंधरवड्याचा ५ वा आणि ११ वा दिवस नारायण नागबळी विधी करण्यासाठी सर्वात योग्य आहे. हस्त नक्षत्र, पुष्य नक्षत्र, किंवा आश्लेषा नक्षत्र अश्या नक्षत्रांवर हा विधी करणे योग्य आहे. तसेच इतर नक्षत्रांच्या दिवशी जसे मृग, अर्ध, स्वाती म्हणून विधी केला जाऊ शकतो. दिवसांपैकी रविवारी, सोमवारी आणि गुरुवारी हा विधी करणे उचित आहे .
प्रत्येक व्यक्तीचा शुभमुहूर्त हा त्याच्या असणाऱ्या इच्छा/काम्य, त्याच्या पत्रिकेतील ग्रहस्थिती यानुसार शुभमुहूर्त हा वेगवेगळा असल्या कारणाने त्र्यंबकेश्वर येथील ताम्रपात्रधारी गुरूजींसोबत संवाद साधूनच येथे पूजा करावी. येथील गुरुजी संबंधित सर्व माहिती आपणांस देतील. या पोर्टलवरील अधिकृत गुरुजींसोबत तुम्ही संवाद साधू शकता. "धनिष्ठा पंचक" नारायण नागबळी करण्यासाठी योग्य नाही. नारायण नागबळी ही पूजा गुरुजींकडून उपलब्ध तारखांना शुभ मुहूर्तावर त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात केली जाते.
पूजा मूल्य / दक्षिणा ही पूर्णतः पूजेसाठी आवश्यक वस्तूंवर (पूजा सामग्री) अवलंबून आहे. नारायण नागबळी पूजा संपन्न झाली की पुरोहितांना दक्षिणा देऊन ह्या विधीची सांगता होते.
Copyrights 2020-21. Privacy Policy All Rights Reserved Designed and Developed By | AIGS Pvt Ltd