Search Bar Design
Search Bar Design
Search Bar Design
Trimbak Mukut

त्र्यंबकेश्वर शिव मंदिर, नाशिक
दर्शन आणि पूजेसाठी पंडित बुक करा

"त्र्यंबकेश्वर हे भारतातील बारा ज्योतिर्लिंगांमधील एक दिव्य ज्योतिर्लिंग आहे"
trimbak Mukut
Search Bar Design
floral-design-golden
floral-design-golden
floral-design-golden
floral-design-golden
body-heading-design त्र्यंबकेश्वर मंदिर body-heading-design
Trimbakeshwar Temple

त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे महत्व |

“त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग” हे भारतातील एक प्राचीन तीर्थस्थान आहे. सर्व १२ ज्योतिर्लिंगापैकी हे विशेष आहे. हे स्वयंभू मंदिर नाशिक शहरापासून २८ किमी अंतरावर सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी वसलेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात स्थित आहे. पवित्र “गंगा गोदावरी” नदीचे उगमस्थान त्र्यंबकेश्वराच्या जवळ आहे. मंदिर प्रांगणाच्या जवळच कुशावर्त तीर्थ आहे. श्री ज्ञानेश्वर माऊलींचे मोठे बंधू श्री निवृत्तीनाथ महाराजांची समाधी देखील त्र्यंबकेश्वर मध्येच आहे. त्र्यंबकेश्वर मध्ये अनेक धार्मिक संस्था देखील आहेत ज्या वेदशाळा, संस्कृत पाठशाळा, कीर्तन पाठशाळा, प्रवचन संस्था चालवितात.

पौराणिक संदर्भानुसार असे सांगितले जाते की, ब्रह्मदेवांनी इथे एका पर्वतावर श्री महादेवांना प्रसन्न करण्यासाठी तप केले जे पुढील काळात “ब्रह्मगिरी पर्वत” नावाने विख्यात झाले. या पर्वतावर एके काळी गौतम ऋषींचा आश्रम होता. गोहत्या पातकातून मुक्तता मिळावी म्हणून त्यांनी कठोर तपश्चर्या केली आणि महादेवांना प्रसन्न केले. गौतम ऋषींच्या विनंतीवरून महादेव इथे त्रिमूर्ती होऊन ज्योतिर्लिंग स्वरूपात विराजमान झाले. तेव्हापासून हे स्थान त्र्यंबकेश्वर म्हणून ओळखले जाऊ लागले. ज्योतिर्लिंग हा शब्द “प्रकाशस्तंभ” ला दर्शवतो. त्र्यंबकेश्वर शिवलिंगाची वास्तविक रचना इतर ११ ज्योतिर्लिंगांपेक्षा वेगळी आहे, कारण त्र्यंबकेश्वर येथे शिवपिंडी मध्ये अंगठ्याच्या आकाराच्या तीन कपार आहेत ज्यात त्रिमूर्ती म्हणजेच “ब्रह्मा-विष्णु-महेश” विद्यमान आहेत. या शिवलिंगातून गोदावरीचा प्रवाह सातत्याने सुरु असतो. या स्वरूपाचे हे जगात एकमेव शिवलिंग आहे. आणखी ह्या मंदिराची विशेषता अशी आहे कि ज्योतिर्लिंगावर “त्रिकाल पूजा” केली जाते जी स्थानिक माहितीप्रमाणे ३५० वर्षांपासून चालू आहे, जी द्वादश ज्योतिर्लिंगांपैकी केवळ त्र्यंबकेश्वर मंदिरातच होते.

"सह्याद्रिशीर्षे विमले वसन्तं गोदावरितीरपवित्रदेशे |
यद्धर्शनात्पातकमाशु नाशं प्रयाति तं त्र्यम्बकमीशमीडे ||"

- श्री आदिगुरू शंकराचार्य कृत द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र

श्लोकाचा अर्थ - पवित्र गोदावरीच्या देशात सह्याद्रीच्या शिखरावर सदा निवास करणाऱ्या त्रिमूर्तीरूप श्री त्र्यंबकेश्वराचे मी अनन्य भक्तिभावाने ध्यान करतो. शुद्ध भावाने जे भक्त इथे दर्शनाला येतात त्यांचे सर्व पाप नष्ट होतात.

त्र्यंबकेश्वर मंदिर ऑनलाइन पूजा बुकिंग (अधिकृत पुरोहितांची यादी):

roll roll

त्र्यंबकेश्वर मंदिर लाईव्ह दर्शन:

“त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट” तर्फे त्र्यंबकेश्वर मंदिर लाईव्ह दर्शन हि एक नाविन्यपूर्ण सुविधा प्रदान करण्यात आली आहे, ज्यामुळे भक्तांना त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन लाईव्ह घेता येईल. हे महत्वपूर्ण पाऊल यासाठी उचलण्यात आले कि, ह्यावर्षी भक्तांना कोव्हीड-१९ ह्या महामारीचे गांभीर्य लक्षात घेऊन महाशिवरात्रीला दिव्य ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश करता आला नाही. सरकारकडून आलेल्या निर्णयाला अनुसरून मंदिर काही काळ बंदच असणार आहेत, त्यामुळे भक्तांना घरबसल्या दर्शन प्राप्त व्हावे यासाठी हे “लाईव्ह दर्शन” करण्याचे महत्वपूर्ण कार्य त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने केले आहे.

त्र्यंबकेश्वर मंदिराची वेळ

त्र्यंबकेश्वर मंदिराची वेळ सकाळी ७ ते रात्री ८ आहे

भाविकांनी दर्शनाच्या वेळीच त्र्यंबकेश्वरला येणे आवश्यक आहे.

त्र्यंबकेश्वर मंदिर माहिती मराठी व अधिकृत पुरोहितांचा (गुरुजींचा) इतिहास:

Jyotirling of trimbakeshwar

पौराणिक कथांनुसार ज्योतिर्लिंगा पासून लगतच्या परिसरात पुण्यभूमी तयार झाली आहे ज्यामुळे इथे केले जाणारे सर्व मनोरथ सफल होतात. भक्त आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी अथवा दोषमुक्त होण्यासाठी इथे अनेक प्रकारचे जप-तप-व्रत मनोभावे करून आपले आराध्य शंकरांना प्रसन्न करण्यासाठी येतात.

बाळाजी बाजाराव ऊर्फ श्री नानासाहेब पेशवे ह्यांनी त्र्यंबकेश्वर मधील विविध पूजा करणारे ज्ञानसंपन्न पुरोहितांना ताम्रपत्र प्रदान केले जे आजही पिढ्यानपिढ्या संरक्षित केले आहे. तेंव्हापासून ताम्रपत्र प्राप्त असलेल्या गुरुजींना "ताम्रपत्रधारी गुरुजी" म्हणून ओळखले जाते. “ताम्रपत्र” म्हणजे तांब्याच्या धातूने बनविलेल्या पत्र्यावर कोरलेले “अधिकार पत्र’’ होय. त्र्यंबकेश्वर महादेव मंदिरात मंदिरात उपस्थित असलेले गुरुजी हे अधिकृतरित्या ताम्रपत्रधारी असल्याने केवळ त्यांनाच पूजा करण्याचा विशेष परंपरागत अधिकार प्राप्त आहे. त्याचप्रमाणे त्र्यंबकेश्वर व मंदिर परिसरात केले जाणारे धार्मिक अनुष्ठाने करण्याचा परंपरागत अधिकार हा इथल्या स्थानिक गुरुजींकडेच आहे.

त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर परिसरात अधिकृत पुजारी किंवा ताम्रपत्रधारी गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली नारायण नागबळी, कालसर्प योग शांती पूजा, त्रिपिंडी श्राद्ध, कुंभ विवाह, रुद्र अभिषेक, महामृत्युंजय मंत्र जाप अशा विधी शास्त्रोक्त पद्धतीने विशिष्ट मुहूर्तावर संपन्न केल्या जातात. अशा पावन स्थळी होणाऱ्या अध्यात्मिक पूजेचा लाभ घेण्यासाठी यजमानांनी अधिकृत गुरुजींनाच संपर्क करावा.

प्राचीन काळापासून त्र्यंबकेश्वर मध्ये येणाऱ्या भाविकांनी केलेल्या अनेक पूजांचे वर्णन ह्या पिढ्यानी जपून ठेवले आहे. इथे येणाऱ्या यजमानांना पूजेची यथायोग्य माहिती व मार्गदर्शन हे या गुरुजींद्वारे केले जाते. अनेक काळापासून इथल्या मान्यवरांनी भाविकांच्या सोयीसाठी एकजूट होऊन कार्य केले कालांतराने त्याचे रूपांतर "पुरोहित संघ" नावाने नोंदणीकृत करण्यात आले आहे. पूजा-अनुष्ठान करण्यासाठी येणाऱ्या यजमानांना इथल्या अधिकृत गुरुजींची ओळख पटावी यासाठी "पुरोहित संघ" सर्व गुरुजींना नोंदणीकृत प्रमाणपत्र बहाल करते तसेच ताम्रपत्राची काळजी घेते.

श्री त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर इतिहास:

हिंदू तीर्थस्थानांपैकी स्वयंभू स्थानात “श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग” ची गणना केली जाते. हे पवित्र मंदिर ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी आहे जेथून गोदावरी नदी उगम पावली आहे. “गोदावरी नदी” हि महाराष्ट्रातील सर्वांत जास्त लांबीची (१४६५ किमी लांब) नदी आहे. अलीकडे सापडलेल्या ऐतिहासिक पुराव्यावरून असे सिद्ध होते की त्र्यंबकेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार इ.स. १७५५-१७८६ मध्ये श्री बाळाजी बाजाराव ऊर्फ श्री नानासाहेब पेशवे यांनी ३१ वर्षांच्या कालावधीत पूर्णत्वास नेला. हेमाडपंती शैलीचे हे मंदिर वास्तुकलेचे अद्भुत प्रतीक आहे. मंदिराची उंची ९० फूट असून त्यास पाच कळस आहेत. हे मंदिर काळ्या पाषाणात बांधले आहे ज्यामुळे मंदिराच्या सौंदर्यात भर पडते.

इथे येणाऱ्या भक्तांना दर्शनाची सोय व्हावी म्हणून मंदिरात प्रवेशासाठी ६ ते ७ रांगा करण्यात आल्या आहेत. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ नंदीची संगमरवरी मूर्ती स्थापित आहे. अशी मान्यता आहे कि नंदी हा शंकरांचा परम भक्त आहे म्हणून नंदीच्या कानात सांगितलेली इच्छा शंकर ऐकतात. मुख्य मंदिरातील गर्भगृहात प्रवेश केल्यावर भाविकांना पवित्र ज्योतिर्लिंगाचे दर्शन घडते.

त्र्यंबकेश्वर येथे साजरे केले जाणारे उत्सव :

Trimbakeshwar Palkhi

त्र्यंबकेश्वर हे तीर्थक्षेत्र आहे त्यामुळे बाराही महिने भाविकांची सतत गर्दी होत असते. श्रावणी सोमवारी त्र्यंबकेश्वरी भक्तांची प्रचंड गर्दी होते. “महाशिवरात्री” हा भारतातील प्रमुख सणांपैकी एक आहे. हा दिवस फाल्गुन कृष्ण चतुर्दशीला असतो. पौराणिक संदर्भानुसार ह्या दिवशी श्री शंकरांनी सृष्टीची रचना केली. त्याचप्रमाणे ह्या दिवशी शिव-पार्वती विवाह झाला. हा पवित्र दिवस भक्तांसाठी मनोकामना पूर्ण करण्यासाठी अति उत्तम मानला जातो. ह्या पवित्र दिवशी भक्त कुशावर्त तीर्थावर पहाटे स्नान करून त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी एकत्र येतात. मंदिरात दर्शनासाठीची वेळ सकाळी ५.३० ते रात्री ९ पर्यंत असते तरीही ह्या दिवशी मुख्य मंदिरात हा उत्सव दिवसाचे २४ तास साजरा होतो. अनेक प्रकारे महादेवाची पूजा ह्या दिवशी होते. ज्यात ज्योतिर्लिंगावर जलाभिषेक व रुद्राभिषेक केले जाते. अनेक प्रकारचे होम-हवन तसेच आरती ह्या दिवशी केली जाते. अनेक भक्त ह्या दिवशी रुद्रजाप करतात. प्राचीन परंपरेनुसार महाशिवरात्रीच्या एक दिवस अगोदर अनेक भक्त “प्रदोष व्रत” करतात. प्रदोष व्रत केल्याने शरीरातील चंद्राचे तत्व सुधारले जाते. अशी मान्यता आहे कि चंद्र सुधारल्याने शुक्र व बुध देखील बळावतात. शुक्राने ऐश्वर्य व बुधाने नौकरी व व्यापाराच्या ठिकाणी लाभ होतात. अशा प्रकारे प्रदोष हे मन व शरीर ह्या दोघांवर प्रभाव टाकणारे आहे. शिव महापुराणात प्रदोष व्रताबद्दल अधिक माहिती आहे. ह्या प्राचीन मंदिराची देखभाल पाहण्यासाठी "त्र्यंबकेश्वर संस्थान (ट्रस्ट)" स्थापन करण्यात आले आहे. संस्थानातर्फे भाविकांसाठी भक्तनिवासाची देखील सोय करण्यात आली आहे.

ह्या पुरातन ज्योतिर्लिंगावर “श्री त्र्यंबकेश्वर संस्थान (ट्रस्ट)” मार्फत पंचमुखी मुकुट स्थापित केलेले आहे. अशी आख्यायिका आहे की हे मुकुट स्वतः पांच पांडवांनी स्थापित केलेले आहे. हे “पांडवांकालीन मुकुट” दुर्मिळ असून अनेक हिरे-रत्नादिकांनी जडित आहे. दर सोमवारी दुपारी ४ ते ५ च्या दरम्यान त्र्यंबकेश्वर गावात एक रमणीय “पालखी सोहळा” आयोजित केला जातो. ज्यात श्री त्र्यंबकेश्वराचे सुवर्णमुकुट भक्तांच्या दर्शनासाठी आरूढ केले जाते. हे सुवर्णमुकुट ढोल-ताशांच्या गजरात कुशावर्त तीर्थावर अभिषेकासाठी आणले जाते, मग तिथे अभिषेक झाल्यावर आरती होते. आरती झाल्यावर नामघोष गात पुन्हा त्र्यंबकेश्वर मंदिरात हे सुवर्णमुकुट प्रस्थापित केले जाते. अशा रीतीने एका विलक्षण अशा पालखी सोहळ्याची सांगता होते आणि भक्तगण उल्हासित होतात.

कुशावर्त तीर्थ आणि कुंभमेळा:

ब्रह्मगिरी पर्वतावरून गोदावरी नदी अदृश्य होऊन कुशावर्त कुंडात प्रकट होते. पुराणांमधील संदर्भांनुसार कुशावर्त तीर्थात “श्री गौतम ऋषी” यांनी गंगा नदीला अडवले म्हणून त्यामुळे पाप निवारण व पुण्यप्राप्तीसाठी अनेक भाविक इथे स्नान करतात. विशेषकरून ह्या ठिकाणी १२ वर्षातून एकदा “कुंभमेळा” भरतो. पौराणिक संदर्भानुसार कुशावर्त तीर्थावर प्रभु श्री रामांनी पित्रांच्या मुक्तीसाठी राजा दशरथाचे श्राद्ध कर्म केल्याचे कळते. म्हणूनच त्रिपिंडी श्राद्ध विधीसाठी अनेक भक्तगण देशविदेशातुन येथे येतात.

ब्रह्मगिरी पर्वत गोदावरी नदीचे उगमस्थान:

Bramhagiri

“ब्रह्मगिरी पर्वत” हे असं प्रतिष्ठित स्थान आहे जिथे पवित्र गंगा नदीचा उगम झाला होता. ब्रह्मगिरी पर्वताची उंची समुद्रसपाटीपासून ४२४८ फूट असून ब्रह्मगिरी च्या पर्वतरांगांतून गंगा नदी वाहत जाते. ब्रह्मगिरी पर्वतावर ७०० पायऱ्या असून शिखराकडे जाण्यासाठी किमान ४ ते ५ तास लागतात.

“गंगाद्वार” हे ब्रह्मगिरी पर्वताचे मुख्य द्वार मानले जाते. पायथ्यापासून साधारण अर्ध्या अंतरावर गंगाद्वार स्थित आहे. येथे श्री “गोदावरी” देवीचे मंदिर सुद्धा आहे. असे मानले जाते की, गंगा नदी प्रथमतः गंगाद्वार येथे प्रकट झाली होती आणि गौतम ऋषींनी “कुशावर्त तीर्थ” इथे गंगेला पुढे जाण्यास अडवले त्यामुळे गोदावरी हि “गौतमी गंगा” नावाने ओळखली जाऊ लागली. कुशावर्त तीर्थावर १२ वर्षातून एकदा येणारा कुंभमेळा भरतो.

पवित्र गंगा नदी ३ दिशेने म्हणजेच पूर्वेकडे-गोदावरी नदी, दक्षिणेकडे-वारणा नदी तर पश्चिम दिशेला पश्चिमवाहिनी नदी म्हणून ओळखली जाते आणि अंततः ती चक्रतीर्थाला जाऊन मिळते. भाविक त्र्यंबकेश्वर मंदिरासमोर पवित्र गंगा आणि अहिल्या नदीच्या पवित्र संगमावर संतती प्राप्तीसाठी वेगवेगळ्या पूजा करण्यासाठी येतात.

त्र्यंबकेश्वरला कसे यावे?

त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी तीन सोपे मार्ग (जसे रस्त्याने, रेल्वेने व हवाईमार्गे) आहेत.

Nearest Places from trimbakeshwar
  • नाशिक ते त्र्यंबक मार्ग - त्र्यंबकेश्वर ते नाशिक हे २९.५ कि.मी. इतके अंतर आहे.
  • पुणे ते नाशिक मार्ग - हे अंतर २४०.५ किमी इतके आहे.
  • मुंबई ते त्र्यंबकेश्वर मार्ग - हे अंतर १८५.७ किमी इतके आहे.
  • शिर्डी ते त्र्यंबकेश्वर मार्ग - हे अंतर ११६.५ किमी इतके आहे.
  • ठाणे ते त्र्यंबकेश्वर मार्ग – हे अंतर घोटीमार्गे १५७ किमी इतके आहे.
  • औरंगाबाद ते त्र्यंबकेश्वर मार्ग - अनेक भाविक औरंगाबाद जिल्ह्यातून त्र्यंबकेश्वरला येण्यासाठी औरंगाबाद-नाशिक महामार्गाने येऊन पुढे नाशिक पासून त्र्यंबकेश्वरला पोचतात. औरगांबाद ते नाशिक १९७ किमी व पुढे २८ असे एकूण २२५ किमी इतके अंतर आहे.
  • जव्हार ते त्र्यंबकेश्वर मार्ग – हे अंतर ५१ किमी इतके आहे.

रेल्वेमार्ग:

विविध राज्यांमधून रेल्वेमार्गाने आपण नाशिक रोड रेल्वे स्टेशन येथे येऊ शकतात व त्यानंतर तिथून पब्लिक वेहिकल ने त्र्यंबकेश्वरला पोहचता येते.

हवाईमार्ग:

निवडक राज्यातून येणाऱ्या भाविकांसाठी नाशिकच्या नजीकचे ओझर विमानतळ उपलब्ध आहे. जिथून खाजगी वाहने घेऊन थेट त्र्यंबकेश्वरला पोचता येते.

महत्वाचे निवेदन: कुठल्याही पूजेच्या सविस्तर माहितीसाठी आपण आमच्या वेब पोर्टलवर दिलेल्या अधिकृत “ताम्रपत्रधारी” गुरुजींशी संपर्क साधावा..

floral-design-golden
floral-design-golden

Copyrights 2020-21. Privacy Policy All Rights Reserved

footer images

Designed and Developed By | AIGS Pvt Ltd

whatsapp icon