पूर्वजांच्या असंतुष्ट इच्छेमुळे निर्माण झालेल्या पितृदोषापासून मुक्ति कशी मिळते?
आपल्या घरातील पूर्वजांच्या आत्म्याला शांती लाभण्यासाठी त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात त्रिपिंडी श्राद्ध अनुष्ठान केल्याने पितृ दोषापासून मुक्ती मिळते.
त्रिपिंडी श्राद्ध का केले पाहिजे?
त्रिपिंडी श्राध्द विधी हि कुटुंबातील मृत असंतुष्ट आत्म्याच्या शांती प्रित्यर्थ केले जाते.
त्रिपिंडी श्राद्ध केव्हा केले पाहिजे?
त्रिपिंडी श्राध्द करण्यासाठी श्रावण, कार्तिक, पौष, माघ, फाल्गुन, व वैशाख महिन्यातील पंचमी, अष्टमी, एकादशी, त्रयोदशी, चतुर्दशी, आणि अमावस्या ह्यापैकी कुठल्याही एका दिवशी तारपत्रधारी गुरुजींनी दिलेल्या मुहूर्तावर केलेले उत्तम असते.
त्रिपिंडी श्राध्द विधी ही पितृ दोषातून मुक्त होण्यासाठी सुचवली जाते?
त्रिपिंडी श्राध्द विधी पितृदोषामुळे होणाऱ्या अडचणींना दुर करण्यासाठी केली जाते.
त्रिपिंडी श्राध्द करण्यासाठी किती कालावधी आवश्यक आहे?
त्रिपिंडी श्राध्द विधी साठी पूर्ण दिवस गरजेचा असून, जर हा विधी अन्य विधी सोबत करण्यात आला तर जास्त कालावधीची आवश्यकता आहे.
त्रिपिंडी श्राध्द पूजा कोणी केली पाहिजे?
परिवारातील कर्ता पुरूष/ (मोठ्या मुलाने) आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ त्रिपिंडी श्राद्ध ही पूजा केली पाहिजे, एकट्या स्त्रियांना ही पूजा करण्यास अनुमती नाही.
त्रिपिंडी श्राध्द करताना काय बंधनकारक असते?
त्रिपिंडी श्राध्द विधी करताना सात्विक भोजन करणे बंधनकारक असते. कांदा, लसूण, जिरे, काळे मीठ, मसूर डाळ इ. पदार्थांचे सेवन वर्ज्य आहे.
तर्पण म्हणजे काय?
तर्पण म्हणजे मृत आत्म्याच्या शांती प्रित्यर्थ केलेले कार्य आहे; ज्यात पाणी, अन्न, तीळ अशा पदार्थांचा नैवद्य पूर्वजांना अर्पण केला जातो.
कन्या पिंड दान प्रदान करू शकतात का?
होय, कोणीही त्यांच्या परिवारातील मृत सदस्याला पिंड दानाची सेवा प्रदान करू शकता.
त्रिपिंडी श्राद्ध पूजेसाठी दक्षिणा काय आहे?
त्रिपिंडी श्राद्ध पूजेसाठी आवश्यक असणाऱ्या सामग्रीवर दक्षिणा अवलंबून आहे.