Trimbak Mukut

त्र्यंबकेश्वरमध्ये त्रिपिंडी श्राद्ध करा. जाणून घ्या पितृ दोष निवारणाची पद्धत.

"त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर हे भारतातील बारा ज्योतिर्लिंगांमधील एक दिव्य ज्योतिर्लिंग आहे"
trimbak Mukut
body-heading-design त्रिपिंडी श्राद्ध पूजा body-heading-design
TRIPINDI SHRADDHA

त्रिपिंडी म्हणजे ह्या श्राद्ध विधीमध्ये पिंड ठेवले जातात. सलग तीन वर्षांपर्यंत ज्या व्यक्तींचे श्राद्ध विधी केले नसतील अशा पित्रांना शांती मिळण्यासाठी त्रिपिंडी श्राद्ध केले जाते. हे श्राद्ध कुठल्याही महिन्याच्या दोन्ही पक्षात (कृष्ण पक्ष/ शुक्ल पक्ष) येणाऱ्या पंचमी / अष्टमी/ एकादशी / त्रयोदशी / चतुर्दशी / अमावस्या ह्यापैकी कुठल्याही दिवशी करता येते.

पत्रिकेतील योगांप्रमाणे देखील त्रिपिंडी श्राद्ध विधी करता येतो. यासंबंधित अधिक माहितीसाठी या पोर्टलवरील अधिकृत गुरुजींसोबत चर्चा करूनच हा विधी संपन्न करावा.

त्रिपिंडी श्राद्ध पूजा का केली जाते?

वर्तमान पिढीपासून मागील तीन पिढीपर्यंत घरातील एखाद्या व्यक्तीचे धार्मिक तिथींप्रमाणे श्राद्ध विधी केले जात नसतील तर त्रिपिंडी श्राद्ध करण्याचे विधान धर्मग्रंथांमध्ये लिहिले आहे. घरातील एखाद्या व्यक्तीचे अकस्मात निधन झाले किंवा काही कारणास्तव कुटुंबियांपैकी एखाद्याचे लग्न न होता मृत्यू झाला असेल तर अशी व्यक्ती मृत्यूनंतर सद्गती प्राप्त होत नाही. याचा परिणाम वर्तमान पिढीतल्या लोकांवर होऊन त्यांना आपल्या जीवनात अनेक अडचणी येतात, ज्यास पितृदोष म्हटले जाते. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत पितृदोष असतो त्याच्या निवारणार्थ हि शांती करणे अत्यंत महत्वाचे आहे. सतत गर्भपात होत असल्यास, बालमृत्यू (४ महिन्यांचा गर्भ ते ९ वर्षांपर्यंतचे बालके) होत असल्यास त्रिपिंडी श्राद्ध विधी करावा. त्रिपिंडी श्राद्ध केल्याने असे पूर्वज पितृयोनीत असल्याने पूजेचा भोग स्वीकार करतात व तृप्त होऊन श्राद्ध कर्त्याला आशीर्वाद देतात. ज्यामुळे अशा व्यक्तीची भरभराट होऊन जीवनात शांती, समाधान व लक्ष्मी येते असे पुराणांमध्ये वर्णित आहे.

“ये न पितुः पितरो ये पितामहा |
य आविविशुरुर्वन्तरिक्षम् ||
य आक्षियन्ति पृथिवीमुत द्यां |
तेभ्यः पितृभ्यो नमसा विधेम ॥”

- अथर्ववेद

श्लोकार्थ - अथर्ववेदात असे सांगितले आहे कि- पिता, पितामह (आजोबा) व प्र-पितामह (पंजोबा) अशा तीन पिढीतल्या पूर्वजांना आम्ही श्राद्धाने तृप्त करतो.

सहा घराण्यातील पितरांना सदगती मिळण्याकरिता त्रिपिंडी श्राद्ध केले जाते.

“पितृवंशे मृतायच |
मातृवांशे तथैवच ||
गुरुश्वशुर बंधुनाम |
येच्यान्ये बांधवास्मृता ॥”

श्लोकार्थ - पितृवंश, मातृवंश, गुरु, सासरे, सख्खा भाऊ, चुलत बंधू वरील सहा घराण्यांमध्ये दोष आढळले असता त्रिपिंडी श्राद्ध केले जाते

त्रिपिंडी श्राद्ध करण्यासाठी सर्वउत्तोम पंडितजी

महत्वाचे निवेदन:-

सर्व यजमानांना विनंतीपूर्वक सूचित केले जाते कि, सर्व पूजा-विधी ह्या त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात ताम्रपत्रधारी गुरुजींकडूनच कराव्यात. केवळ त्यांनाच परंपरागत अनेक पिढयांपासून त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पूजा करण्याचा हक्क प्राप्त आहे. तसेच त्यांचेकडून करविल्या जाणाऱ्या पूजा ह्या आपणांस समाधान देतील आणि ज्यातून आपली फसवणूक होणार नाही. आमचा हाच प्रयत्न आहे कि आपण योग्य अशा अधिकृत स्रोतापर्यंत यावे.

त्रिपिंडी श्राद्ध पूजा त्र्यंबकेश्वर मध्येच का करावी?

त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे अतिप्राचीन असे धार्मिक स्थळ आहे. जीवात्म्यास मुक्ती देणारे त्रिमूर्ती श्री ब्रह्मा-विष्णु-महेश ज्योतिर्लिंग स्वरूपात निवास करतात आणि पित्रांना सद्गती प्रदान करणाऱ्या गौतमी गोदावरी नदीचे उगमस्थान त्र्यंबकेश्वर हे असल्याने दरवर्षी इथे श्रद्धाळू त्रिपिंडी श्राद्ध विधी करण्यासाठी एकत्र येतात. त्रिपिंडी श्राद्ध पूजा कुशावर्त तीर्थावर केली जाते.

“तीर्थं त्रैयंबकं नाम सर्वतीर्थनमस्कृतम् |
यत्रास्ते भगवान्भीमः स्वयमेव त्रिलोचन ||”

- पद्म पुराण, अध्याय ११

श्लोकार्थ - सर्व तीर्थांमध्ये त्र्यंबकेश्वर हे संपूर्ण तीर्थ आहे. इथे स्वयं त्रिलोचन श्री शंकर विद्यमान आहेत. अशा परम पवित्र त्र्यंबकेश्वर महादेवाला माझे भक्तिपूर्वक नमस्कार असो.

त्रिपिंडी श्राद्ध आपल्या पूर्वजांना सद्गती प्रदान करणारा एक अगदी सहज व उत्तम असा मार्ग आहे. एखाद्या वस्तूच्या गोलाकार स्वरूपाला पिंड असे म्हटले जाते. प्रतीक रूपाने आपले शरीर देखील एक पिंडच आहे. म्हणून म्हटले जाते कि ‘जे पिंडी ते ब्रह्मांडी’. आपल्या भोवताली अनेक बाधा अथवा पिशाच्च हे उपस्थित राहून त्रास देतात. पृथ्वी वर वास्तव्य करणारे पिशाच्च ‘तमोगुणी’, अंतरिक्षात वास्तव्य करणारे पिशाच्च ‘रजोगुणी’ तर वायुमंडलात राहणारे पिशाच्च ‘सत्वगुणी’ म्हटले जातात. हे पिशाच्च आपल्या घराण्यातील जे पूर्वज आहेत त्यांना त्रास देतात. या त्रासामुळे आपल्या दैनंदिन जीवनात अनेक दुर्धर संकटे येतात. कार्यसिद्धी होत नाही, संतती होण्यास अडचणी येतात. लग्नकार्य जुळत नाही. व्यवसायात नुकसान होते. सततचे आजारपण वाट्याला येते. त्यामुळे अशा पिशाच्चांपासून सुटका करण्यासाठी त्रिपिंडी श्राद्ध केले जाते.

त्र्यंबकेश्वर मधील ‘कुशावर्त ’ म्हणून प्रसिद्ध तीर्थ हे भक्तांना सर्व इच्छित लाभ देणारे आहे. इथे गौतम ऋषींनी गोदावरी नदीला दर्भाने आवृत्त केले म्हणजे बांधले (अडविले) म्हणून ह्या पवित्र तीर्थावर केलेले स्नान, दान, तर्पणादि पित्रांना शांती देणारे आहे. त्यामुळेच प्राचीन काळापासून आजदेखील हजारोंच्या संख्येत भक्तगण त्र्यंबकेश्वरला त्रिपिंडी श्राद्ध पूजा करण्यासाठी जमतात.

त्रिपिंडी श्राद्ध करण्यासाठी योग्य मुहूर्त कोणता?

त्रिपिंडी श्राद्ध पूजा अमावास्येला केलेले उत्तम असते. पितरांच्या शांतीसाठी अमावस्या हा उत्तम दिवस असतो. पितृपक्षातील अमावास्या ही त्रिपिंडी श्राद्धासाठी विशेष मानली जाते. भाद्रपद महिन्यातील पौर्णिमेला श्राद्ध पौर्णिमा म्हटले जाते. पौर्णिमेपासून पुढील १६ दिवस पित्रांच्या तर्पणासाठी उत्तम आहेत. याशिवाय वर्षभरात देखील असे अनेक महत्वाचे योग असतात ज्या दिवशी पित्र अन्न ग्रहण करण्यासाठी भूलोकावर येतात. “धर्मसिन्धु” ह्या ग्रंथात ९६ कालखंडाचे वर्णन आढळते. तसेच आपण याबद्दल सविस्तर माहितीसाठी आमच्या अधिकृत वेब पोर्टलवरील "ताम्रपत्रधारी" गुरुजींना संपर्क करू शकता.

त्रिपिंडी श्राद्ध पूजेची पद्धती काय आहे?

BENEFITS OF DOING TRIPINDI SHRADDHA

सर्व प्रकारच्या अतृप्त आत्म्याच्या सद्गती प्राप्तीसाठी त्रिपिंडी श्राद्ध अवश्य केले पाहिजे. ह्या श्राद्ध विधीमध्ये गोत्र किंवा पित्रांच्या नामाचे उच्चारण केले जात नाही कारण कुठली बाधा कुठल्या पित्रांकडून आली आहे हे माहीत नसते. सर्व प्रकारच्या पित्रांच्या सद्गतीप्राप्तीसाठी धर्मग्रंथांमध्ये त्रिपिंडी श्राद्धाचे विधान सांगितले आहे. या पूजेमध्ये पुढीलप्रमाणे विधी केल्या जातात.

  • प्रथम कुशावर्त तीर्थावर स्नान करून श्राद्ध विधीसाठी संकल्प घ्यावा.
  • तीन कलशांची स्थापना व पूजा केली जाते
  • तीन देवतांची (ब्रम्हा, विष्णू, महेश) स्थापना व पूजन केले जाते
  • तीन चटरूपी ब्राह्मणांची पूजा सम्पन्न करून नैवेद्य दाखवला जातो
  • त्यानंतर यव (जव), व्रीही आणि तीळापासून तीन पिंड बनवावे. हे तीन तर्हेचे पिंड विशिष्ट उद्देशाने केले जातात.
  • यवपिंड (धर्मपिंड):

    पितृवंशात व मातृवंशात ज्या मृत व्यक्तींची उत्तरक्रिया झाली नाही, किंवा संतती न झाल्याने ज्यांचे पिंडदान झाले नसेल अथवा जन्मतः जे अंध-अपंग असल्याने त्यांचे लग्नकार्य झाले नसतील अशा पित्रांच्या शांतीप्रित्यर्थ यवपिंड प्रदान केले जाते. . त्यामुळे याला ‘धर्मपिंड’ देखील म्हटले जाते. यात सात्विक पित्रांच्या मुक्तीसाठी ब्रह्मपूजन केले जाते आणि यवपिंड दिले जाते.

  • मधुरत्रययुक्त व्रीहिपिंड:

    पिंडावर साखर, मध आणि शुद्ध तूप एकत्रित करून अर्पण केले जाते, ज्यामुळे यास मधुरत्रय म्हटले जाते. राजस पित्रांपासून आलेल्या दोष निवारणासाठी विष्णु पूजन करून तांदळाच्या साळीचे मधुरत्रययुक्त व्रीहिपिंड दिले जाते.

  • तिळपिंड:

    पृथ्वी वर भटकत राहून इतरांना कष्ट देणाऱ्या पित्रांना तीळ पिंडाने उत्तम शांती लाभते. तामस पित्रांपासून होणाऱ्या दोष निवारण करण्याकरीता तिळपिंड दिले जाते.

    मग ह्या तीनही पिंडांना दर्भांवर पसरवून त्यावर तिलोदक शिंपडून पिंडदान करावे. पिंडाची पूजा करावी आणि श्री विष्णुंच्या प्रसन्नतेसाठी तर्पण करावे. आलेल्या गुरुजींना भोजन देऊन त्यांना दक्षिणेच्या स्वरूपात सोने चांदी, वस्त्र, पात्र, पंखा, पादत्राण इत्यादी वस्तूंचे दान द्यावे.

त्रिपिंडी श्राद्ध पूजा केल्याने काय लाभ होतात?

TRIPINDI SHRADDHA PUJA AT TRIMBAKESHWAR NASIK
  • श्राद्ध केल्याने पित्रांना संतुष्टि लाभते ज्यामुळे श्राद्ध करणाऱ्या व्यक्तीला तेजस्विता, प्रसिद्धी, दीर्घ आयु प्राप्त होतात
  • कार्यात यश मिळते
  • उत्तम व निरोगी संतती लाभते
  • नोकरीत पदोन्नती होते
  • व्यवसायात भरभराट होते
  • सामाजिक मान-सन्मान, पद-प्रतिष्ठा प्राप्त होण्यास पित्रांचा आशीर्वाद लाभतो
  • घरात सुख-शांती नांदते, कौटुंबिक सुख प्राप्त होते
  • नैराश्य दूर होऊन प्रसन्नता लाभते

पितृदोषाचे दुष्परिणाम काय आहेत?

TRIPINDI SHRADDHA VIDHI
  • कार्यशक्तीचा ऱ्हास होऊ शकतो
  • घरातील व्यक्तींना सततचे आजारपण येऊ शकते
  • वाड-वडिलांच्या पुण्याईने होणारा भाग्योदय टळू शकतो
  • शिक्षण पूर्ण होण्यात अडचणी येऊ शकतात
  • विवाह होण्यास अडचणी येऊ शकतात अथवा विवाहभंग होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते
  • पती-पत्नीमध्ये एकमत नसणे अथवा वादविवाद होणे
  • संततीस प्रतिबंध होऊ शकतो अथवा संतती मतिमंद होऊ शकते
  • नोकरी अथवा व्यवसायाच्या ठिकाणी संघर्ष करावा लागू शकतो
  • मानसिक नैराश्य अथवा चिडचिड होऊ शकते
  • घरात केव्हाही अशांतीचे वातावरण निर्माण होऊ शकते
  • नोकरी अगर धंद्यात लक्ष न लागणे
  • सततचे आजारपण मागे लागणे
  • मानसिक नैराश्य येणे
  • घरात सतत अशांतीचे वातावरण असणे
  • कौटुंबिक सलोखा खराब होऊन क्लेश होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते

श्राद्ध म्हणजे काय ?

भारतीय संस्कृतीत अगदी वैदिक काळापासून श्राद्ध केले जाते. पित्रांच्या शांतीसाठी श्रद्धा व शुभ संकल्पाने केल्या जाणाऱ्या पिंडदान व तर्पण विधीला ‘श्राद्ध’म्हटले जाते. 'श्राद्ध' केल्याने त्या आत्म्याला शांती लाभते.

श्राद्धाचे किती प्रकार आहेत?

  1. नित्य श्राद्ध- दर दिवशी केले जाणारे श्राद्ध
  2. सांवत्सरिक- वार्षिक तिथीला करण्यात येणारे श्राद्ध
  3. काम्य श्राद्ध- मनोकामना पूर्ण करण्यासाठी करण्यात येणारे श्राद्ध
  4. वृद्धिश्राद्ध- सौभाग्य आणि सुखप्राप्तीसाठी केले जाणारे श्राद्ध
  5. सपिण्डन- त्रिवार्षिक श्राद्ध ज्यात प्रेतपिंड हे पितृपिंडात सम्मिलीत केले जाते
  6. महालय- पितृपक्ष, अमावस्या अथवा विशिष्ठ तिथींना केले जाणारे श्राद्ध
  7. शुद्धयर्थ- शुद्धि हेतु केले जाणारे श्राद्ध
  8. दैविक / यात्रार्थ / तीर्थश्राद्ध- देवतांसाठी करण्यात येणारे श्राद्ध, तीर्थस्थानावावर केले जाणारे श्राद्ध
  9. पुष्ट्यर्थ- स्वतः व पारिवारिक सुख-समृद्धिच्या ऊत्कर्षासाठी करण्यात येणारे श्राद्ध
  10. नान्दी- काही मंगलमय कार्यात जसे संतती झाल्यास किंवा लग्नकार्याच्या वेळी, षोडश संस्कार वेळी करण्यात येणारे श्राद्ध
  11. त्रिपिंडी श्राद्ध- हे श्राद्ध काम्य श्राद्धामध्ये गणले जाते. कुटुंबातील मागील तीन पिढयांमधील पित्रांच्या शांती प्रित्यर्थ केले जाणारे हे श्राद्ध केले जाते

त्रिपिंडी श्राद्ध पूजा विधीसाठी किती कालावधी लागतो?

त्रिपिंडी श्राद्ध पूजेला ३ तास लागतात.

पूजा मूल्य / दक्षिणा:

पूजा मूल्य / दक्षिणा ही पूर्णतः पूजेसाठी आवश्यक वस्तूंवर (पूजा सामग्री) अवलंबून आहे. त्रिपिंडी श्राद्ध पूजा संपन्न झाली की पुरोहितांना दक्षिणा देऊन ह्या विधीची सांगता होते.

महत्वाच्या सूचना :

  • सर्व भक्त पूजेच्या दिवसांत केवळ ब्राह्मणांनी प्रदान केलेले सात्विक (कांदा आणि लसूण वर्जित) भोजन ग्रहण करू शकतात
  • पूजा करणाऱ्या भक्तांना केवळ पांढरे वस्त्र प्रधान करण्याची परवानगी आहे. (जसे पुरुषांसाठी पांढरे धोती, गमछा, रुमाल, आणि स्त्रियांसाठी पांढरी साडी किंवा पंजाबी ड्रेस, काळ्या अथवा हिरव्या रंगाची साडी नेसू नये.)

स्मरणार्थ केलेले टिपण:- त्रिपिंडी श्राद्धासारखेच पितृदोषावर परिणामकारक असे नारायण-नागबली शांती पूजा शांती पूजा देखील त्र्यंबकेश्वालाच होते. त्रिपिंडी श्राद्ध हा २-३ तासाचा विधी आहे. यासोबतच आपण नारायण-नागबळी देखील करू शकता. नारायण-नागबळी पूजा ३ दिवसाची असते. या दोन्ही पूजा एकूण ३ दिवसातच केल्या जातात. ज्यामुळे वेगळे कालावधी द्यावे लागत नाही. पूजेचे उत्तम परिणाम प्राप्त होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी आमच्या वेब पोर्टलवर दिलेल्या अधिकृत ताम्रपत्रधारी गुरुजींकडूनच संपर्क साधावा.

संपर्कांसाठी पत्ता: श्री गंगा गोदावरी मंदिर, पहिला मजला, कुशावर्त तीर्थ चौक, त्र्यंबकेश्वर - ४२२२१२

FAQ's

आपल्या घरातील पूर्वजांच्या आत्म्याला शांती लाभण्यासाठीत्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात म्हणजेच कुशावर्त परिसरात त्रिपिंडी श्राद्ध अनुष्ठान केल्याने पितृ दोषापासून मुक्ती मिळते.
त्रिपिंडी श्राध्द विधी हि कुटुंबातील मृत असंतुष्ट आत्म्याच्या शांती प्रित्यर्थ केले जाते.
त्रिपिंडी श्राध्द करण्यासाठी श्रावण, कार्तिक, पौष , माघ, फाल्गुन , व वैशाख महिन्यातील पंचमी , अष्टमी, एकादशी, त्रयोदशी, चतुर्दशी, आणि अमावस्या ह्यापैकी कुठल्याही एका दिवशी तारपत्रधारी गुरुजींनी दिलेल्या मुहूर्तावर केलेले उत्तम असते.
त्रिपिंडी श्राध्द विधी पितृदोषामुळे होणाऱ्या अडचणींना दुर करण्यासाठी केली जाते.
त्रिपिंडी श्राध्द विधी साठी २ ते ३ तास गरजेचे आहे, जर हा विधी अन्य विधी सोबत करण्यात आला तर जास्त कालावधीची आवश्यकता आहे.
परिवारातील कर्ता पुरूष/ (मोठ्या मुलाने) आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ त्रिपिंडी श्राद्ध ही पूजा केली पाहिजे, एकट्या स्त्रियांना ही पूजा करण्यास अनुमती नाही.
त्रिपिंडी श्राध्द विधी करताना सात्विक भोजन करणे बंधनकारक असते. कांदा , लसूण इ. पदार्थांचे सेवन वर्ज्य आहे.
तर्पण म्हणजे मृत आत्म्याच्या शांती प्रित्यर्थ केलेले कार्य आहे; ज्यात पाणी, तीळ अशा पदार्थांचा नैवद्य पूर्वजांना अर्पण केला जातो.
होय, घरातील पुरुष त्यांच्या वतीने देऊ शकतो अथवा ब्राह्मणाद्वारे सुद्धा देता येते.
त्रिपिंडी श्राद्ध पूजेसाठी आवश्यक असणाऱ्या सामग्रीवर दक्षिणा अवलंबून आहे.

तुमचे प्रश्न विचारा




-Bharat Jain Says
23-Jun-2022
पित्रदोष पुजा करणे आहे खर्च कीती कधी करावी बाकी ईतर पुजा करणे आहे खर्च कीती कधी करावी
टिप्पणी उत्तर
-संदीप मारुती होळकर Says
10-Jun-2022
त्रिपिंडी श्राध्‍द करण्‍यास किती खर्च अपेक्षित आहे व तो कधी केला जातो.
टिप्पणी उत्तर
-पांडुरंग शिंदे Says
12-Oct-2022
किती खर्च येईल त्रिपिंडी साठी
-Vilas Pawar Says
19-Feb-2023
त्रिपिंडी श्राध्‍द करण्‍यास किती खर्च अपेक्षित आहे व तो कधी केला जातो. Send contact no.
-मधुरिका केसरकर Says
05-Jun-2022
त्रिपींदी श्राद्ध व नागबली पूजा केल्यावर 45 दिवस मांसाहार करावा की करु नये.कारण
टिप्पणी उत्तर
-कोमल कदम Says
29-Apr-2022
त्रिपिंडी श्रद्धा करायचे आहे माझा मिस्टर चे तर ते 3 मे ला करू शकतो का किंवा तकधी करू शकतो
टिप्पणी उत्तर
-शिवाजी रामभाऊ पांचाळ Says
27-Feb-2022
त्रिपीडंश्राध्द करायचे आहे पण आई वारुन तिन महिने झाले आहे कधी केव्हा करावे? अपेक्षित खर्च किती येईल?
टिप्पणी उत्तर
-admin Says
28-Feb-2022
पूजेच्या खर्च जाण्यासाठी तुम्ही वरील दिलेल्या गुरुजींना थेट संपर्क साधा ते तुम्हाला मार्गदर्शन व माहिती देतील
-आप्पासाहेब नारायण ठाकूर Says
21-Jan-2022
त्रिपींडी श्राद्ध नवरा बायको असे जोडीने करावे लागते काय?
टिप्पणी उत्तर
Load more

Copyrights 2020-21. Privacy Policy All Rights Reserved

footer images

Designed and Developed By | AIGS Pvt Ltd