प्राचीन काळापासून तीर्थक्षेत्र म्हणून “श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग” प्रसिद्ध आहे. इथे साक्षात त्रिमूर्ती स्वरूपात श्री ब्रह्मा, विष्णु व महेश निवास करतात. तीन देवतांचा ज्योतिर्लिंगाच्या स्वरूपात इथे वास असल्याने ह्यास त्र्यंबकेश्वर हे नामाभिधान झाले. गौतम ऋषींच्या तपश्चर्येने श्री महादेवांनी आपल्या जटेतून गंगेला इथे प्रकट केले. जी “गंगा गौतमी” नावाने ओळखली जाते. अशा पावन भूमीत अनेक तीर्थस्थाने आहेत, ज्यात प्रमुख “कुशावर्त तीर्थ” आहे. ब्रह्मगिरी पर्वतावरून गंगा लुप्त पावत असल्याने गौतम ऋषींनी तिला इथे दर्भाच्या साहाय्याने अडविले ज्यामुळे ह्या तीर्थास “कुशावर्त” असे नाव आहे. ह्या तीर्थाचा महिमा स्कंद पुराणात सांगण्यात आला आहे. इथे केलेले दान, तर्पण, श्राद्ध थेट पित्रांपर्यंत पोचतात असे महात्म्य अनेक पुराणामध्ये उपलब्ध आहे.
वर निर्देशित पूजा ह्या त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातच केल्या जातात, ज्यासाठी अनेक पिढयांपासून इथले तीर्थ पुरोहित प्रसिद्ध आहे. ह्या पूजा करण्याचे ज्ञान त्यांनी वैदिक परंपरेनुसार जपले आहे. पूर्वापार चालत असलेल्या ह्या पूजांचे यजमानांची नावे देखील त्यांच्याकडे उपलब्ध आहे ज्यास “नामावली” असे म्हटले जाते. ह्या तीर्थ पुरोहितांना त्र्यंबकेश्वर मध्ये "ताम्रपत्रधारी" पुरोहित म्हटले जाते. तर आपण देखील धर्मशास्त्रानुसार विधिवत पूजा-अर्चना करण्यासाठी त्र्यंबकेश्वर क्षेत्रात येऊ शकतात. ह्या पूजा करण्याचे अधिकृत अधिकार इथल्या पुरोहित संघ राखीव ठेवते. सर्व अधिकृत गुरुजींना हे संघ प्रमाणपत्र प्रदान करते व ताम्रपत्राचा सांभाळ करते.
आमच्या वेबपोर्टलच्या सहाय्याने आपण अधिकृत “ताम्रपत्रधारी” गुरुजी तसेच विविध पूजा कशा कराव्यात याबद्दल सविस्तर माहिती घेण्यासाठी थेट गुरुजींशी संपर्क करू शकतात. पूजेची आवश्यक सामग्री हि गुरुजींकडून दिली जाते त्यासाठी आवश्यक दक्षिणा आलेले यजमान देतात. पूजेची दक्षिणा ही पूजेला आवश्यक सामग्री वर पूर्णतः अवलंबून आहे.
आपण ह्या वेबपोर्टमध्ये “त्र्यंबकेश्वर गुरुजी” ह्या विभागात जाऊन सर्व अधिकृत गुरुजींची संपूर्ण माहिती व दूरध्वनी क्रमांक पाहू शकता आणि अधिक माहितीसाठी “ताम्रपत्रधारी” गुरुजींसोबत संपर्क करू शकता.
संपर्कांसाठी पत्ता: श्री गंगा गोदावरी मंदिर, पहिला मजला, कुशावर्त तीर्थ चौक, त्र्यंबकेश्वर - ४२२२१२
अधिक माहितीसाठी पत्ता: रुंगटा मॅजेस्टिक, सूर्या हॉटेल जवळ, नाशिक-मुंबई महामार्ग – ४२२००९