Trimbak Mukut

त्र्यंबकेश्वर येथे कुंभ विवाह पूजा
मांगलिक दोष म्हणजे काय? अर्थ आणि प्रकार जाणून घ्या.

"त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर हे भारतातील बारा ज्योतिर्लिंगांमधील एक दिव्य ज्योतिर्लिंग आहे"
Trimbak Mukut
कुंभ विवाह
कुंभ विवाह

“कुंभ विवाह” ही त्र्यंबकेश्वर येथे केल्या जाणाऱ्या शांती पूजांपैकी महत्वाची अशी एक पूजा आहे. कुंभ विवाह हा वैधव्य योग टाळण्यासाठी केला जातो.

“जन्मोत्थं च विलोक्य बालविधवायोगं विधाय व्रतं
सल्लग्नेऽच्युतमूर्तिपिप्पलघटै : कृत्वा विवाहं स्फुटं”

- ज्योतिर्मयूख, विवाहादिसंस्कारप्रकरण

श्लोकार्थ - जेव्हा एखाद्या कन्येच्या कुंडलीत वैधव्ययोग असेल तेव्हा विष्णुमूर्ति, अश्वत्थ वृक्ष (वट वृक्ष) किंवा कुंभाबरोबर विवाह करून मगच तिला सुयोग्य अशा वराला द्यावी.

महत्वाचे निवेदन:- सर्व यजमानांना विनंतीपूर्वक सूचित केले जाते कि, सर्व पूजा-विधी ह्या त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात ताम्रपत्रधारी गुरुजींकडूनच कराव्यात. केवळ त्यांनाच परंपरागत अनेक पिढयांपासून त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पूजा करण्याचा हक्क प्राप्त आहे. तसेच त्यांचेकडून करविल्या जाणाऱ्या पूजा ह्या आपणांस समाधान देतील आणि ज्यातून आपली फसवणूक होणार नाही. आमचा हाच प्रयत्न आहे कि आपण योग्य अशा अधिकृत स्रोतापर्यंत यावे.

कुंभ विवाह म्हणजे काय?

KUMBH VIVAH

जेव्हा एखाद्या कन्येच्या जन्मपत्रिकेत ग्रहमानानुसार वैधव्य योग असतो तेव्हा त्याच्या निवारणार्थ कुंभविवाह विधी केला जातो. हा योग संबंधित कन्येच्या जन्मपत्रिकेत जन्मतःच असतो. अशा कन्येचा कुंभविवाह न करता वराशी विवाह झाला तर तिला वैधव्य प्राप्त होते. या विधीत प्रथम कन्येचा विवाह मातीच्या मटक्यावर स्थापित असलेल्या श्री विष्णूंच्या मूर्ती सोबत संपन्न केला जातो.

अगदी नेहमीच्या विवाहविधी प्रमाणे हा विवाह केला जातो. यात कन्येचे कन्यादानही होते. संपूर्ण विवाह सोहळा संपन्न झाल्यानंतर विष्णूंच्या मूर्तीचे जलाशयात विसर्जन केले जाते. अशाप्रकारे कुंभविवाह विधी पूर्ण होतो. यानंतर संबंधित कन्येचा विवाह इच्छुक नियोजित वरासोबत करता येतो त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे येथे त्रिमूर्ती ब्रम्हा,विष्णू,महेश स्वयंभू स्वरूपात विराजमान असल्याने या पवित्र स्थानाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळेच येथे कुंभविवाह विधी केल्यास तो अधिक लाभदायी ठरतो.

कुंभ विवाह का करावा?

कन्येच्या जन्मपत्रिकेत ग्रहमानानुसार वैधव्य योग असल्यास त्याच्या निवारणार्थ कुंभविवाह विधी केला जातो.

अर्क विवाह म्हणजे काय?

एखाद्या विधुराचे ३ विवाह होऊन तीनही पत्नींचा मृत्यू झाला असेल, व संबंधित पुरुष पुनः विवाह करण्यास इच्छुक असेल तर त्यावेळी चौथा विवाह संपन्न होण्याआधी करण्यात येणारा विधी म्हणजे अर्कविवाह.

अर्क विवाह का करावा?

जेव्हा एखाद्या विधुराचे ३ विवाह होऊन तीनही पत्नींचा मृत्यू झाला असेल, व संबंधित पुरुष पुनः विवाह करण्यास इच्छुक असेल तर त्यावेळी अशा पुरुषाचा अर्कविवाह विधी संपन्न केला जातो. अर्कविवाह विधी म्हणजेच प्रथम त्या पुरुषाचा विवाह अर्की सोबत म्हणजेच रुईच्या वृक्षासोबत लावला जातो. अगदी नेहमीच्या विवाहविधी प्रमाणे हा विवाह केला जातो. तदनंतर संबंधित पुरुषाचा विवाह नियोजित वधू सोबत लावून दिला जातो. अर्कविवाह विधी केल्यानंतर ती व्यक्ती आपल्या जोडीदारासोबत सुखाने संसार करू शकते. तसेच एखाद्या ब्रम्हचारी पुरुषाचा मृत्यू झाला असता, त्याचे अंत्यविधी आधी करतेवेळी अर्कविवाह केला जातो. ब्रह्मचारी व्यक्तीचा मृत्य झाल्याने त्यांच्या कुटुंबियांना कुठलेही दोष लागू नये वा त्यांना कोणत्याही प्रकारे त्रास होऊ नये याकरिता ब्रह्मचारी पुरुषाचा अर्कविवाह केला जातो. त्यानंतरच त्याचे अंत्यविषयी पार पाडले जातात ; जेणेकरून त्याच्या आत्म्यास सदगती लाभते व कुटुंबियातील इतर सदस्यांना त्यापासून काही त्रास होत नाही .

अर्क विवाह केव्हा करावा?

त्र्यंबकेश्वर मधील अधिकृत ताम्रपत्रधारी गुरुजी नी दिलेल्या शुभ काळात गुरुजींच्या घरी अर्कविवाह विधीपूर्ण केला जातो.

मंगळ दोष म्हणजे काय?

TYPES OF MANGLIK DOSHA

हा दोष मंगळ ग्रहाच्या कुंडलीत १२ स्थानांपैकी कुठल्या स्थानात मंगळ आहे त्या स्थानावरून निश्चित केला जातो. जेव्हा एखाद्याच्या जन्मपत्रिकेत मंगळ ग्रह १, ४, ७, ८, १२ यापैकी एका स्थानात जन्माच्या वेळी आला असेल तर हा दोष उद्भवतो. अनेक लोक केवळ पत्रिकेत मंगळ आहे हे पाहून घाबरतात व नको ते गैरसमज करतात. केवळ पत्रिकेत मंगळ दोष असल्याने अशुभ होत नाही. मंगळाच्या पत्रिकेत चार स्थिती असतात - आंशिक मंगळ, सौम्य मंगळ, वक्री मंगळ व तीव्र मंगळ. या गोष्टी विचारात घेऊनच मंगळाची स्थिती ठरवणे श्रेयस्कर असते, केवळ पत्रिकेत मंगळ असल्याने घाबरून जाऊ नये. मंगळ दोषाचा प्रभाव किती आहे हे पत्रिकेवरूनच निश्चित सांगता येते.

सर्वसाधारणपणे मंगळ हा उग्र स्वभावाचा ग्रह मानला जातो. मंगळदोषाची सविस्तर माहिती मुहूर्त चिंतामणी, ज्योतिर् महार्णव, मुहूर्त गणपती यासारख्या ग्रंथांमध्ये आढळून येतात.

एखाद्या व्यक्तीच्या मंगळ दोष असेल तर त्याच्या निवारणार्थ मंगळदोष निवारण शांती पूजा म्हणजेच ''भातपूजा'' केली जाते. या पोर्टलवरील संबंधित गांधीकृत गुरुजींशी संपर्क साधून आपण अधिक माहिती घेऊ शकता

मंगळ दोष लक्षणे:

  • बोलण्यात व्यावहारिकपणा अथवा कटूभाषी स्वभाव हा मंगळ दोष आहे. त्यामुळे मंगळीक व्यक्तीने नेहमी संयम ठेऊन बोलावे अथवा प्रिय व्यक्ती दुरावण्याची शक्यता असते.
  • वर्चस्व गाजवणे हा मंगळ दोष असल्याने विवाहाच्या बाबतीत तर अवघड स्थिती निर्माण करतो त्यामुळे अशा व्यक्तीने सौम्यपणा, हळुवारपणा स्वभावात बाळगल्यास अनेक अडचणी दूर होतात.
  • मंगळीक व्यक्ती ही स्वकर्तुत्वाने पुढे येते, त्यामुळे तिला जोडीदाराकडून सहकार्याची अपेक्षा भासू शकते, आणि जोडीदाराने साथ न दिल्यास वैवाहिक जीवन असंतुलित होऊन परिणामी नैराश्य वाट्याला येते. ज्यामुळे भांडणे देखील होऊ शकतात. हे टाळण्यासाठी जोडीदाराशी जुळवून घेतल्यास, कालांतराने घट्ट नाते प्रस्थापित होऊन कार्यसिद्धी करता येते.

कुंडलीत असलेल्या स्थानावरून मंगळाचे पुढील दोष निर्माण होतात. जन्मपत्रिकेत कुठल्याही पाच पैकी एका स्थानी मंगळ थांबल्यास खालीलप्रमाणे दोष दिसून येतात.

१) प्रथम स्थानातील मंगळ दोष:

ज्योतिषशास्त्रानुसार जन्मपत्रिकेत पहिले स्थान हे ‘तनु’ किंवा ‘लग्न स्थान’ म्हटले जाते. ह्या स्थानात मंगळ असल्यास तो पत्रिकेतील चौथ्या, सातव्या आणि आठव्या स्थानावर दृष्टी ठेवतो. चौथे स्थान ‘सुख स्थान’ असल्याने कुटुंबात मंगळ ग्रहामुळे कलह होऊ शकतो. सातवे स्थान हे ‘विवाह स्थान’ असल्याने मंगळ ग्रहामुळे विवाहित जोडप्यांमध्ये जोडीदाराशी मतभेद निर्माण होऊ शकतात. मंगळाच्या तापट स्वभावामुळे वैवाहिक जोडीदाराशी छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद-विवाद हे भयंकर रूप धारण करू शकतात. त्याचप्रमाणे आठवे स्थान हे मृत्यू स्थान असल्याने मंगळाच्या दृष्टीने जोडीदाराला किंवा स्वत:ला अपघात होण्याची शक्यता असते.

२) चतुर्थ स्थानातील मंगळ दोष:

चतुर्थ स्थानात मंगळ पत्रिकेत असल्यावर सातव्या स्थानी, दहाव्या स्थान, आणि अकराव्या स्थानी आपली दृष्टी ठेवतो. ज्योतिषशास्त्रानुसार चतुर्थ स्थान हे ‘विवाह स्थान’ म्हटले जाते. कौटुंबिक दबावाखाली लग्न झाल्यास मंगळीक व्यक्ती आपल्या जोडीदारा सोबत नाराज राहते. त्यातही मंगळाची दृष्टी विवाह स्थानात असल्यास जोडीदारासोबत सततचे भांडणे, वादविवाद होत राहते. परिणामी हे वादविवाद थेट कोर्ट-कचेरीत किंवा घटस्फोटात रूपांतरित होऊ शकतात. त्याचप्रमाणे कुंडलीत दहावे स्थान हे ‘कर्म स्थान’ मानले जाते. कर्म स्थानी मंगळाची दृष्टी असल्यास अशा व्यक्तीचे संपूर्ण जीवन विवाहानंतर बदलते, नोकरी अथवा व्यवसायाच्या ठिकाणी आर्थिक संकटांचा सामना करावा लागू शकतो. त्याचप्रमाणे जन्मपत्रिकेत अकरावे स्थान हे ‘लाभ स्थान’ म्हटले जाते. पित्याकडून लाभणारी वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ मंगळाची दृष्टी असेल तर लाभत नाही.

३) सप्तम स्थानातील मंगळ दोष:

जेव्हा मंगळ हा जन्मपत्रिकेत सप्तम स्थानात येतो तेव्हा त्याची दृष्टी प्रथम स्थानी, द्वितीय स्थानी आणि दहाव्या स्थानी येते. प्रथम स्थान हे ‘तनु स्थान’ असल्याने कुटुंबात अशांती काय राहू शकते. पती पत्नीला एकमेकांवर संशय येऊ शकतो. मंगळाचा स्वभाव तापट असल्याने कुटुंबातील सौख्य हिरावले जाऊ शकते. द्वितीय स्थान हे ‘धन स्थान’ म्हटले जाते. द्वितीय स्थानी मंगळाची दृष्टी आल्यास आर्थिक चणचण निर्माण होऊ शकते, धनसंचय होण्यास अडचणी, आर्थिक संकटे निर्माण निर्माण होऊ शकतात. त्याचप्रमाणे दहावे स्थान हे ‘कर्म स्थान’ म्हटले जाते. कर्म स्थान हे पित्यापासून असल्याने पित्याकडून मंगळीक व्यक्तीला आर्थिक आधार लाभण्यात अडचणी येऊ शकतात. तसेच नोकरीत पदोन्नती होण्यात विलंब लागू शकतो. याशिवाय भाग्योदय उशिराने होतो. शिक्षण पूर्ण होत नाही अथवा टप्याटप्याने पूर्ण होते.

४) अष्टम स्थानातील मंगळ दोष:

ज्यावेळी मंगळ हा अष्टम स्थानात येतो तेव्हा त्याची दृष्टी तो दुसऱ्या, तिसऱ्या आणि अकराव्या स्थानी टाकतो. दुसरे स्थान हे ‘धन स्थान’ म्हटले जाते. ह्या स्थानात मंगळाची दृष्टी आल्यास प्रवासाच्या दरम्यान चोरी अथवा रहात्या ठिकाणी घरफोडी सारख्या घटना घडू शकतात. त्याचप्रमाणे तिसरे स्थान हे ‘पराक्रम स्थान’ म्हटले जाते. मंगळाची दृष्टी इथे आल्यास व्यक्तीला खडतर परिश्रम करावे लागते, केलेल्या मेहनतीचे फळ उशिराने प्राप्त होते. अकरावे स्थान हे ‘लाभ स्थान’ म्हटले जाते. ह्या ठिकाणी मंगळाची दृष्टी आली कि व्यक्तीस मित्रांकडून मिळणारा आधार, भाऊ-बहिणींकडून अथवा सासरच्यांकडून होणारे सहकार्य प्राप्त होत नाही. नोकरीत पदोन्नती होत नाही, शेअर्स किंवा विमा काढला असेल तर मिळणारी रक्कम बुडण्याची शक्यता असू शकते.

५) द्वादश स्थानातील मंगळ दोष:

द्वादश स्थानात मंगळ स्थिरावल्यास तिसऱ्या स्थानी, सहाव्या स्थानी, आणि सप्तम स्थानी दृष्टी ठेवतो. तिसरे स्थान हे पराक्रम स्थान म्हटले जाते. इथे मंगळाची दृष्टी आल्यास जीवनातील उत्साह जाऊन आत्मविश्वास कमी होतो, नोकरी अथवा व्यवसायाच्या ठिकाणी पद-प्रतिष्ठा कमी होऊ शकते. अशा व्यक्तीचे भाऊ-बहिणींशी पटत नाही, वादविवाद होऊ शकतात. त्याचप्रमाणे सहावे स्थान हे रिपु स्थान म्हटले जाते. ह्या स्थानात मंगळाची दृष्टी आल्यास अशा व्यक्तीला गुप्त शत्रूंपासून त्रास संभवतो. जीवनात संकटांचा सामना करावा लागू शकतो. कोर्ट-कचेरीचे प्रसंग निर्माण होऊ शकतात. सहावे स्थान हे रोग स्थान म्हणून देखील ओळखले जाते. ह्या स्थानी मंगळाची दृष्टी आल्यावर व्यक्तीला जीवित धोका संभवतो. अकस्मात अपघात किंवा सततचे आजारपण होऊ शकते. ज्योतिषशास्त्रानुसार सातवे स्थान हे विवाह स्थान म्हटले जाते. मंगळाची दृष्टी सप्तम स्थानात आल्यास जोडीदारासोबत खटके उडणे, वादविवाद, भांडण-तंटे निर्माण होण्याची शक्यता असते. परिणामी वैवाहिक जीवनात असमाधान येते. जोडीदाराकडून सहकार्य लाभत नाही, त्यामुळे कौटुंबिक सुखाचा ऱ्हास होण्याची शक्यता होऊ शकते.

कुंभ विवाह करण्यासाठी योग्य मुहूर्त कोणता?

कुंभ विवाह हा प्रतीकात्मक विवाह असल्याने ह्याचा मुहूर्त नसतो. हा विधी त्र्यंबकेश्वर मधील ताम्रपत्रधारी गुरुजींच्या घरी मार्गदर्शनाखाली त्यांनी दिलेल्या वेळेत करता येतो. त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात म्हणजेच ताम्रपत्रधारी गुरुजींच्या घरी कुंभ विवाह, अर्कविवाह तसेच इतर शांती कर्म केले जातात.

कुंभ विवाह विधीसाठी किती कालावधी लागतो?

कुंभ विवाह विधीसाठी २ ते ३ तास लागतात.

कुंभ विवाह त्र्यंबकेश्वर मध्येच का करावे?

त्र्यंबकेश्वर हे भारतातील प्रमुख असे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असे महत्वाचे मंदिर आहे. इथे केलेले कुंभ विवाह विधी हे तात्काळ फळ देणारे आहे, कारण इथे साक्षात ब्रह्मा, विष्णु व महेश ज्योतिर्लिंग स्वरूपात विराजमान आहेत तसेच गंगा मातेचे इथे प्रकटस्थान आहे. सर्व देवी-देवता इथे गुप्त रूपात निवास करतात. त्यामुळे सर्व मनोकामना इथे पूर्ण होतात. ताम्रपत्रधारी गुरुजींच्या घरी कुंभ विवाह, अर्कविवाह केला जातो.

कुंभ विवाह करण्याची पद्धती काय आहे?

KUMBH VIVAH POOJA VIDHI
  • प्रथम आमच्या वेब-पोर्टल वरील अधिकृत ताम्रपत्रधारी गुरुजींशी संपर्क करून कुंभ विवाहाचा दिवस व वेळ ठरवावा.
  • कुंभ विवाह पूजेमध्ये सर्वप्रथम स्त्रीचे पालक, भाऊ आणि मामा उपस्थित असणे आवश्यक असते. यांपैकी कुणी नसेल तर गुरुजींशी त्र्यंबकेश्वरला येण्याआधी विचारून घ्यावे
  • पूजेची सामग्री व साहित्य हे अधिकृत गुरुजी उपलब्ध करून देतील केवळ आपली दिलेल्या वेळी उपस्थिती गरजेची आहे
  • कुंभ विवाह करताना गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे वस्त्रे परिधान करणे आवश्यक आहे. काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नये
  • स्वस्तिवाचन करून पूजेसाठी संकल्प केले जाते
  • श्री गणेशांचे गंध, पुष्प, अक्षतेने पूजन केले जाते
  • कुंभ विवाह करण्याअगोदर कुंभावर श्री विष्णु मूर्तीची स्थापना व पूजन केले जाते
  • त्याचप्रमाणे अग्नी देवतेचे आवाहन करून दीप प्रज्वलन केले जाते
  • कुंभ विवाह झाल्यावर श्री विष्णु मूर्ती जलाशयात विसर्जित केली जाते
  • पूजा संपन्न झाल्यावर गुरुजींना दान-दक्षिणा देऊन आशीर्वाद घेतल्यावर पूजेची सांगता होते

पूजा मूल्य / दक्षिणा:

पूजा मूल्य / दक्षिणा ही पूर्णतः पूजेसाठी आवश्यक वस्तूंवर (पूजा सामग्री) अवलंबून आहे. कुंभ विवाह पूजा संपन्न झाली की पुरोहितांना दक्षिणा देऊन ह्या विधीची सांगता होते.

महत्वाच्या सूचना: पूजा करणाऱ्या स्त्री भक्तांना पिवळी साडी नेसण्याची परवानगी आहे.

FAQ's

मंगळ दोषाचे निवारण कसे केले जाते?
कुंडलीमधील मंगळ दोष हा विवाहास होणाऱ्या विलंब अथवा अडचणींच्या वेळी लक्षात येतो, तसेच यावर उपाय म्हणून भातपूजा हा विधी केला जातो.
मंगळीक कन्येशी लग्न केल्यास काय परिणाम होतात?
मंगळीक कन्येशी लग्न केल्यास विवाहनंतर अनेक अडचणी जसे उदासीनता, ताण, तणाव इत्यादींचा सामना करावा लागतो.
कुंभ विवाह विधी लग्नानंतर केला जाऊ शकतो का?
जर एखाद्या कन्येच्या कुंडलीत वैधव्य योग असेल तर लग्नाआधी कुंभ विवाह विधी करणं अनिवार्य आहे.
मंगळीक असण्याचा काय फायदा आहे?
जी व्यक्ती मंगळीक असते, ती अतिउत्साही असून तिचे स्वप्नांवर लक्ष केंद्रित असते.
कोणतीही व्यक्ति मंगळीक आहे हे कसे समजते?
जन्म कुंडलीद्वारे, ज्या व्यक्तीच्या जन्म कुंडलीमध्ये मंगळ ग्रह दुसऱ्या, चौथ्या, सातव्या, आठव्या किंवा बाराव्या स्थानावर स्थपित असेल तेव्हा अशी व्यक्ती मंगळीक असल्याचे समजते.
जन्मपत्रिकेतील मंगळ दोष किती प्रकाराचे असतात?
जन्मपत्रिकेतील मंगळ दोष - आंशिक मंगळ, सौम्य मंगळ, तीव्र मंगळ असे आहेत.
अर्क विवाह म्हणजे काय?
एखाद्या विधुराचे ३ विवाह होऊन तीनही पत्नींचा मृत्यू झाला असेल, व संबंधित पुरुष पुनः विवाह करण्यास इच्छुक असेल तर त्यावेळी चौथा विवाह संपन्न होण्याआधी करण्यात येणारा विधी म्हणजे अर्कविवाह.


Copyrights 2020-21. Privacy Policy All Rights Reserved Designed and Developed By | AIGS Pvt Ltd